Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका; SSC मार्फत 4300 पोलीस उप निरीक्षक पदांसाठी भरती

0

दिल्ली पोलीस विभागातील उपनिरीक्षक, सीमा सुरक्षा दलातील उपनिरीक्षक, केंद्रीय राखीव पोलीस दलातील उपनिरीक्षक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील उपनिरीक्षक, भारत तिबेट सीमा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र सीमा बलातील पोलीस उपनिरीक्षक तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक दीच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

पात्र उमेदवारांनी ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ssc.nic.in या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे. संगणकावर आधारित परीक्षा नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात येणार आहे. दिल्ली पोलीस दलातील पुरुष उपनिरीक्षकाची २२८ पदे, तसेच दिल्ली पोलीस दलातील महिला पोलीस उपनिरीक्षकांची ११२ पदे, निमलष्करी दलातील पुरुष पोलीस उपनिरीक्षकासाठीची ३७९१ पदे, तसेच निमलष्करी दलातील महिला पोलीस उपनिरीक्षकासाठीची १२ पदे अशा एकूण ४३०० पदांच्या भरतीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.