Take a fresh look at your lifestyle.

UPSC भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी

0

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ‘वन टाइम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू केला आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससी भरती परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशाने ओटीआर सेवा सुरू करण्यात आली आहे.


यूपीएससी ओटीआर प्लॅटफॉर्म:- यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जावे लागेल. ओटीआर प्लॅटफॉर्मवर त्यांची मूलभूत वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवाराची नोंदणी पूर्ण झाल्यावर, माहिती आयोगाच्या सर्व्हरमध्ये सुरक्षितपणे संग्रहित केली जाणार आहे. उमेदवार ज्या परीक्षेसाठी अर्ज करतो त्या परीक्षेच्या ऑनलाइन अर्जामध्ये त्याची माहिती स्वयंचलितपणे भरली जाईल.


यूपीएससीचे ओटीआर पोर्टल उपयुक्त:- यूपीएससीने आपल्या नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ओटीआर उमेदवारांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. यूपीएससीद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे मूळ वैयक्तिक तपशील पुन्हा पुन्हा भरावे लागणार नाहीत. यामुळे उमेदवारांकडून चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता टाळता येईल. वैयक्तिक तपशीलाची जबाबदारी उमेदवारांची असेल.