Jio मध्ये नोकरीची संधी; लवकर करा अर्ज
रिलायन्स जिओ इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. व्यवसाय विश्लेषक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Tech/ B.E.आणि MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 0-3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना हे ज्ञान असणं आवश्यक:- उमेदवारांना statistical analysis चं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना MS Excel, Word आणि Power point चं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना गुगल अॅनालिटिक्स टूलकिटचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना व्यवसाय, आयटी, विश्लेषणासाठी दूरसंचार कंपन्या, टेलिकॉम डोमेनमधील किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक:-
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.jio.com या लिंकवर क्लिक करा.