Take a fresh look at your lifestyle.

मनरेगा रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान लाभासाठी अर्ज सुरु

0

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2022-23 अंतर्गत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या फळबाग / फुलपिके लागवड, व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट व शेततळे या घटकांसाठी अनुदानाचा लाभ
होण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

मागेल त्याला काम देणे व गावामध्ये आर्थिक समृध्दी आणणे हे मनरेगा योजनेचे उद्दिष्ट्य असून यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार जॉबकार्ड धारक असावा. अर्जदार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसुचित जमाती ( विमुक्त जमाती), दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी या सर्वांना प्राधान्यक्रम दिल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना, अल्प भूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात यावे.
अर्जदाराची जमिन (0.05 हेक्टर ते जास्तीत जास्त 2
हेक्टर पर्यंत ) असणे आवश्यक.


आवश्यक कागदपत्रे:- खालील कागदपत्रे आवश्यक असून अर्ज गावातील ग्रामपंचायतीमध्ये करावे.
सातबारा उतारा 7/12, 8 अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, जॉब कार्ड

 

अनुदानः- मनरेगा अंतर्गत व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट,

शेततळे व फळबाग/ फुलपिके ही कामे मंजुर आहेत,
त्यानुसार खालील प्रमाणे अनुदान राहील.
■व्हर्मी कंपोष्ट- रक्कम रुपये 11 हजार 944 प्रति
युनिट,
■ नाडेप कंपोष्ट – रक्कम रुपये 10 हजार 537 प्रति
युनिट,
■ शेततळे आकारमानानुसार रक्कम रुपये 60 हजार
ते रक्कम रुपये 3 लाख पर्यंत.
■ फळबाग/ फुलपिके – जास्तीत जास्त रक्कम रुपये
2 लाख प्रति हेक्टर याप्रमाणे.
अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात येते. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.