Take a fresh look at your lifestyle.

इंडिया पोस्ट तर्फे तब्बल 1 लाख जागांसाठी मेगाभरतीची घोषणा

0

भारतीय टपाल विभागात एक लाखाहून अधिक पदं रिक्त आहेत. म्हणूनच आता केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सरकारने देशभरातील 23 मंडळांमध्ये रिक्त पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे आता देशातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तब्बल एक लाख उमेदवारांना जॉब्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


इंडिया पोस्टने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार काही पदांच्या जागा खालीलप्रमाणे आहेत.

महाराष्ट्रात किती जागा:-
पोस्टमन 9884 जागा; मेल गार्ड 147 जागा मल्टी-टास्किंग पोस्ट 5478  जागा

काय असतील पात्रतेचे निकष:- या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत आणि त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी, उमेदवारांनी इंटर किंवा इयत्ता 12 वी पूर्ण केलेली असावी. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पदाचा किमानसंबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.


वयोमर्यादा:- भारतीय टपाल विभागाच्या नियमांनुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे किमान वय किमान 18 वर्षे आणि कमाल 32 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे.

अशा पद्धतीन करा अप्लाय:-
इंडिया पोस्ट -indiapost.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. मुख्यपृष्ठावरील भर्ती लिंकवर क्लिक करा. तुम्हाला अर्ज करायचे असलेले पोस्ट निवडा, पात्रता निकष तपासा. स्वतःची नोंदणी करा. फॉर्म भरा फी भरा आणि सबमिट करा