Take a fresh look at your lifestyle.

मोबाईल टॉवरच्या स्थापनेशी संबंधित फसवणुकीबद्दल सावधगिरी बाळगण्यासाठी दूरसंचार विभागाकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

0

भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या दूरसंचार विभागाने, मोबाईल टॉवरच्या स्थापनेशी संबंधित फसवणुकीबद्दल सावधगिरी बाळगण्याच्या अनुषंगाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. काही अप्रामाणिक कंपन्या / संस्था / व्यक्ती सामान्य जनतेची फसवणूक करून मोबाईल टॉवर्स बसवण्याच्या नावाखाली त्यांना मोठ्या मासिक भाड्याचे वगैरे आमिष दाखवत पैसे उकळतात हे दूरसंचार विभागाच्या निदर्शनाला आले आहे.


मार्गदर्शक सूचना:-
1. मोबाइल टॉवर्सच्या स्थापनेसाठी जागा भाडे तत्वावर /
भाड्याने देण्यामध्ये दूरसंचार विभाग / ट्रायचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभाग नाही.
2. दूरसंचार विभाग/ट्राय किंवा त्यांचे अधिकारी मोबाईल
टॉवरच्या स्थापनेसाठी कोणतेही “ना हरकत प्रमाणपत्र”
जारी करत नाहीत.
3. मोबाइल टॉवर्स स्थापित करण्यासाठी दूरसंचार सेवा
प्रदाते (टीएसपी) आणि पायाभूत सुविधा प्रदाते
(आयपी-1) यांची अद्ययावत यादी,
https://dot.gov.in आणि https://dot.gov.i
n/infrastructure provider. या दूरसंचार
विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
4. कोणतीही कंपनी/संस्था/व्यक्ती यांनी मोबाईल टॉवर
बसवण्यासाठी पैसे मागितल्यास, अधिक सावधगिरी
बाळगावी आणि कंपनीचे अधिकारपत्रे पडताळून ओळख तपासावी अशा प्रकारची खबरदारी घेण्याचा इशारा जनतेला देण्यात येत आहे. टीएसपी आणि आयपी -1 संस्थेचे सदस्य मोबाईल टॉवर स्थापित करण्यासाठी पैसे मागत नाहीत, याची खात्री संस्थेने केली आहे.


5. जर कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारची फसवणूक
आढळली, तर तो/ती व्यक्ती स्थानिक पोलिस आढळली, तर तो/ती व्यक्ती स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडे संबंधित घटनेची तक्रार दाखल करू शकतो.
6. याव्यतिरिक्त, दूरसंचार विभागाच्या स्थानिक क्षेत्रीय
विभागाशी देखील संपर्क साधला जाऊ शकतो, या
संपर्कासाठीचे तपशील दूरसंचार विभागाच्या
https://dot.gov.in/relatedlinks/director-
general-telecom या संकेतस्थळावर उपलब्ध
आहेत.