Take a fresh look at your lifestyle.

महत्वाचे! कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोग कधी मिळणार? केंद्र सरकारचे मोठे स्पष्टीकरण

0

केंद्र सरकारने लोकसभेत सांगितल्याप्रमाणे, वाढती महागाई लक्षात घेता देशातील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी महागाई भत्ता देण्यात येतो. लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी
यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे की, देशात 8 वा वेतन आयोग नेमण्यासंदर्भात अद्याप कुठलाही विचार झालेला नाही. देशातल्या वाढत्या महागाई निर्देशांकासोबत पगार जुळवून घेण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना नियमितपणे महागाई भत्त्यातली (DA) वाढ दिली जात असल्याचा निर्वाळा केंद्र सरकारने दिला आहे.


महागाई भत्ता ३८ टक्क्यांवर वाढवला…
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4% वाढ झाली आहे. सरकारने ही घोषणा केली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की DA मधील वाढ AICPI च्या डेटावर अवलंबून आहे. पहिल्या सहामाहीची आकडेवारी जाहीर झाली आहे. यामध्ये निर्देशांकानुसार आता नवीन आकडा 0.2 अंकांनी वाढून 129.2 वर पोहोचला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.