Take a fresh look at your lifestyle.

विमान वाहतूक क्षेत्रात 1 लाखाहून अधिक लोकांना रोजगार

0

नागरी उड्डाण मंत्रालयाने 08 ऑगस्ट 2022 रोजी संसदीय समितीसमोर हा अहवाल सादर केला. या दरम्यान नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, येत्या दोन वर्षात देशातील विमान वाहतूक क्षेत्रात 1 लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळू शकतो.

यात वैमानिक (Pilot), केबिन क्रू, अभियंते (Engineers), तंत्रज्ञ, विमानतळ कर्मचारी, ग्राउंड हँडलिंग, कार्गो, रिटेल, सुरक्षा, प्रशासकीय आणि विक्री कर्मचारी म्हणून भरती केली जाऊ शकते. नव्या भरतीची माहिती मंत्रालयाच्या वेबसाइटवर – civilaviation.gov.in मिळेल. लोकसभेत सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हवाई (Aviation) वाहतूक आणि वैमानिक बांधकाम क्षेत्रात सध्या 2,50,000 लोक कार्यरत आहेत. सन 2024 पर्यंत हा आकडा 3,50,000 पर्यंत वाढू शकतो, असा अंदाज मंत्रालयाने व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत 1 लाख लोकांना थेट नोकरी मिळू शकते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे.


मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कामांपैकी सुमारे 50 टक्के कामे ब्लू-कॉलर कामगारांसाठी असतील. लोडर, क्लीनर,ड्रायव्हर्स, मदतनीस इत्यादी तसेच मंत्रालयानुसार येत्या पाच वर्षांत विमान प्रवाशांची वाढती संख्या बघता आणखी १० हजार वैमानिकांची गरज भासणार आहे.