Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका! ‘सोनालिका’ करणार तीन हजार तरुणांची भरती

0

देशातील आघाडीचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका आयटीएल ही भारतातील सर्वात तरुण ट्रॅक्टर उत्पादक कंपनी ठरत आहे. व्यावसायिक कंपन्यांच्या दृष्टीने अशक्य गोष्टी साध्य करण्यासाठी तरुणांमध्ये असलेल्या गतिमानतेवर सोनालिकाचा पूर्ण विश्वास आहे.


आपल्या मनुष्यबळामध्ये ताज्या प्रतिभांचा समावेश कारण्यासाठी सोनालिका आयटीएल तयारी करत असून, ती राज्य पातळीच्या आयटीआय आणि इतर तत्सम संस्थांमधून ३ हजारहून अधिक प्रतिभावान तरुणांची भरती करणार आहे. त्याद्वारे ग्रामीण आणि निमशहरी तरुणांना अखिल भारतीय पातळीवरील डीलर नेटवर्क टीममध्ये सामील होण्यास प्रोत्साहन देण्यात येईल.


भरतीच्या या मोहिमेमुळे तिच्या विद्यमान डीलर वर्कफोर्सला ग्रामीण भागात व्याप्ती वाढवण्यासाठी बळकटी मिळेल. इच्छुक आयटीआय शिक्षित तरुण कंपनीशी hiring@sonalika.com वर संपर्क साधू शकतात.