Take a fresh look at your lifestyle.

सांगली एसटी महामंडळात ७५० पदे रिक्त

0

सांगली- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील चालक तथा वाहकांच्या १०१ रिक्त पदांसाठी भरती झाली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाने पात ५० उमेदवारांनाच नियुक्ती दिली आहे. उर्वरित ५१ उमेदवारांच्या रोजी-रोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाच्या सांगली विभागाकडे ७५० पदे रिक्त आहेत. ती भरली नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी चालक, वाहकांची बिले काढून त्यांची वयोमर्यादाही संपली आहे.

५१ चालक भरती लटकली:- एसटी महामंडळाच्या सांगली विभागासाठी १०१ चालक तथा वाहकांची गरज होती. यापैकी ५० कर्मचायांची भरती झाली असून, त्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. उर्वरित ५१ चालकांची भरती थांबली असून, ही केव्हा होणार, याकडे इच्छुक उमेदवाराचे लक्ष लागले आहे.