Take a fresh look at your lifestyle.

अनुसूचित जाती, जमातींच्या उमेदवारांसाठी १८ दिवसीय नि:शुल्क निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन

0

महाराष्ट्र शासन, उद्योग संचालनालय, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) मुंबई आयोजित आणि महाराष्ट्र उद्योजक, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष (MAITRI) मुंबई यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी १८ दिवसीय नि:शुल्क निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजन करण्यात येत आहे.


मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रम व निवड मुलाखत:- पाटील मारुती मंदिर हॉल, दुसरा मजला, पाटील वाडी, एन. सी. केळकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८. बुधवार, दिनांक. २० जुलै २०२२ सकाळी ११:०० वाजता

आवश्यक कागदपत्रे 
१- स्वतःचा जातीचा दाखला
२- शाळा सोडल्याचा दाखला
३- आधार कार्ड
४- मार्कशीट
५- पासपोर्ट साईझ फोटो (२)
(वरील सर्व कागदपत्रे ओरिजिनल तपासणीसाठी आणि त्याच्या दोन प्रति झेरॉक्स सबमिट करण्यासाठी आणाव्यात)

विशेष सूचना
उद्योजकता परिचय कार्यक्रमात सहभागी होऊन मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांनाच १८ दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होता येईल.
निःशुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम(REDP)
कालावधी : २२ जुलै २०२२ ते ०८ ऑगस्ट २०२२

प्रशिक्षणास निवड होण्यासाठी किमान अटी व पात्रता
● प्रशिक्षणार्थींच्या निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
● वयोमर्यादा: किमान १८ कमाल ५० वर्षे
● रहिवासी – उमेदवार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील किमान
१५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
● शैक्षणिक पात्रता: किमान ७ वी पास
● महिला उमेदवारांना प्राधान्य
● स्वःताचा उद्योग व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छा
● कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा
अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती २० जुलै २०२२ च्या परिचय कार्यक्रमात देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क
विभागीय अधिकारी, MCED एमएमआर
मो. ७९७७२४२१६७
कार्यक्रम आयोजक
मो. ८०९७४३१३७९
मो. ७५०६८५७०४६
खाली दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन अर्ज करावेत.
https://forms.gle/LcsedG2ktrVoenDY7