Take a fresh look at your lifestyle.

अनुसूचित जातीतील युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी करीता मोफत निवासी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मांग, मांतग, मिनिमादिगा, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधे मांग, मांग-गारोडी, मांग गारूडी समाजातील युवक-युवतींसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ.मध्ये लिपिक वर्गीय स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत निवासी प्रशिक्षण कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मांग-गारुडी इतर तत्सम संवर्गातील ५० विद्यार्थ्यांना आय.बी.पी.एस., एल.आय.सी., रेल्वे, बँक लिपीक व त्या समकक्ष पदाच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी ४ महिन्याच्या कालावधीचे (निवास व भोजन व्यवस्थेसही) मोफत प्रशिक्षण कार्यक्रम (कोचिंग क्लासेस) खाजगी संस्थेच्या माध्यमातून ओम व्हिजन अॅकॅडमी पुणे या एका ठिकाणी राबविण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण केंद्रावर नमूद जातीतील ५० युवक-युवतींना गुणवतेनुसार प्रवेश देण्यात येईल. यातील ३०% जागा महिलांकरीता राखीव राहतील. ३% जागा दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव राहतील. या प्रशिक्षण केंद्रावर नमूद जातीतील ५० युवक-युवतींना गुणवतेनुसार प्रवेश देण्यात येईल. यातील ३०% जागा महिलांकरीता राखीव राहतील. ३% जागा दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव राहतील.


वरील जातींच्या इच्छुक व पात्र युवक-युवतींना Website : http//:barti.maharashtra.gov.in या वेबसाईट वरून ‘Notice Board’ च्या सदराखालील Coachings-Mang-Matang लिंकवरून अर्ज डाऊन लोड करुन किंवा खालील नमूद संस्थेच्या कार्यालयातून प्राप्तकरून, खालील ओम व्हिजन अॅकॅडमी प्रशिक्षण केंद्र पत्ता ओम व्हिजन ॲकॅडमी स्वाध्या महाविद्यालय तळ मजला लक्ष्मी रोड सदाशीव पेठ पुणे-४११०३० संपर्क क्र. ९०६७४३६०८४ माध्यमातून राबविण्यात येणार आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी पुणे महसुल विभागातील केंद्राशी संपर्क साधून त्या केंद्राकडे अर्ज दि. १५/०७/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करण्यात यावे.

पात्रता :-
१) महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मांग, मातंग,मांग-गारुडी इतर तत्सम संवर्गातील असावा.
२) अर्जदाराचे वय १८ ते ३४ पर्यन्त असावे.
३) अर्जदार किमान १२ वी उतीर्ण असावा.
४) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
५) निवड केलेल्या उमेदवारांची प्रशिक्षणा दरम्यान निवासाचा व भोजनाच्या खर्चासाठी शासन निर्णयानुसार निर्णयानुसार बार्टी कडून वर नमूद संबंधित संस्थेला निधी देण्यात येईल व उमेदवारासाठी निःशुल्क निवास व भोजन व्यवस्था वर नमूद संस्थेमार्फत करण्यात येईल.
६) उमेदवारांना बार्टी मार्फत लिपीक स्पर्धा परिक्षा तयारीसाठी रु. ३०००/- किंमतीचे पुस्तकांचा संच देण्यात येईल.
७) विहीत नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रांसहीत अर्ज दाखल केलेल्या पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा (screening test) वर नमुद संस्थेमार्फत दि.
१७ जुलै, २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. घेण्यात येईल. त्याआधारे उमेदवारांची गुणानुक्रमे कोंचिगसाठी निवड करण्यात येईल.
८) उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम दि. १५ जुलै २०२२ सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत राहील.
९) सदर प्रशिक्षण दि. ०१ ऑगस्ट २०२२ पासून बार्टीने निर्धारीत केलेल्या विहित तारखेला सुरू करण्यात येईल.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-
१) उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
२) जातीच्या प्रमाणपत्राची सांक्षाकित प्रत
३) कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र सांक्षाकित
४)शाळा सोडल्याचा दाखला (TC) सांक्षाकित प्रत
५) उमेदवाराचे आधार कार्ड सांक्षाकित प्रत
६) दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचा दाखला सांक्षाकित प्रत

अधिकृत वेबसाईट http//:barti.maharashtra.gov.in