एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ; लवकर घ्या लाभ
रा. प. महामंडळाव्दारे विविध सामाजिक घटकांना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विविध पुरस्कारार्थी
यांना स्मार्टकार्ड देण्यात येत आहे. कोरोना विषाणु (कोव्हिड १९) ची दुसरी लाट उद्भवल्यामुळे व रा. प.
महामंडळातील कर्मचा-यांच्या संपामुळे ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड प्राप्त करून घेण्याकरिता या कार्यालयाचे पत्र क्र. राप/वाह/सवलत / स्मार्ट कार्ड / १२२८, दि.३०.०५.२०२२ अन्वये दि. ३०.०६.२०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली होती.

आषाढी पंढरपुर यात्रा असल्याकारणाने सदर यात्रेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून व ज्येष्ठ नागरिकांच्या येत असलेल्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण (Issuance) करणेसाठी दि. ३१.०८.२०२२ पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे. त्यानुसार विभागांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत
१. ज्येष्ठ नागरिक यांस स्मार्टकार्ड प्राप्त करुन घेण्यासाठी दि. ३१.०८.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
२. दि. ३१.०८.२०२२ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना
प्रवासाकरिता सध्याची प्रचलीत असलेली ओळखपत्र
ग्राह्य धरण्यात येऊन प्रवास करण्यास मुभा देण्यात यावी. यानंतर दि. ०१.०९.२०२२ पासून सद्या प्रचलित असलेली ओळखपत्रे रा.प. प्रवासा करिता ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
३. तसेच आगारातील ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्ड
तातडीने संबंधितांस वितरीत करण्याबाबत व आगारात कोणत्याही लाभार्थ्यांचे स्मार्टकार्ड शिल्लक राहणार नाही अशा सुचना आगार व्यवस्थापक यांना देण्यात याव्यात.
४. सदर मुदतवाढीबाबत व ज्येष्ठ नागरिक स्मार्टकार्ड
नोंदणीकरण आगारात प्राप्त झालेली स्मार्टकार्ड ज्येष्ठ
नागरिकांनी घेऊन जाणेबाबत विभाग नियंत्रक / आगार व्यवस्थापक यांनी स्थानिक पातळीवर प्रसिद्धी द्यावी. विभाग नियंत्रक यांनी विभागीय वाहतूक अधिकारी विभागीय लेखाधिकारी, आगार व्यवस्थापक, आगार लेखाकार, स्थानक प्रमुख यांना सदर मुदतवाढीबाबत सविस्तर सुचना द्याव्यात. आगार व्यवस्थापकांनी प्रस्तुत मुदतवाढीची माहिती सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी व चालक/ वाहक यांना व्हावी या हेतुने कर्मचारी सुचना फलक, रोकड व तिकिट विभाग, स्थानक प्रमुख कार्यालय, प्रवासी सुचना फलक इ. ठिकाणी वाचनीय दर्शनीय स्वरुपात प्रसिद्ध करण्यात यावी.
