आजच करा पॅनकार्ड आधारकार्डला लिंक; न केल्यास दुप्पट दंड लागणार
भारतीय नागरिकांना त्यांची दोन सर्वात महत्त्वाची
कागदपत्रे, आधार आणि पॅन (कायम खाते क्रमांक) कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आयकर विभागाने पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. तसे न केल्यास दंड आकारण्यात येईल. यापूर्वी पॅन कार्ड आणि आधार लिंकिंगची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ होती. मात्र,आता ही अंतिम तारीख एक वर्षाने वाढवण्यात आली आहे.

लोक आता 31 मार्च 2023 पर्यंत त्यांचे पॅन-
आधार कार्ड लिंक करू शकतात, पण एक नियम आहे. जे लोक 31 मार्च 2022 ते 30 जून 2022 पर्यंत त्यांचे आधार आणि पॅन कार्ड लिंक करतील त्यांना 500 रुपये दंड भरावा लागेल. 30 जून 2022 नंतर त्यांचे आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याचा विचार करणाऱ्यांना 1,000 रुपये दुप्पट दंड आकारला जाईल.

पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आयकर विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
https://www.incometax.gov.in/iec/foportal