पालकांनो, …आता आपल्या पाल्याला मिळणार सुरक्षा कवच; जाणून घ्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची संपूर्ण माहिती
विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही
प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्यातील इयत्ता १ ली ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना “विमा कंपन्यामार्फत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट, २००३ पासून राबविण्यात येत होती. यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे विम्याचे हप्ते एकत्रितरित्या शासनाकडून अदा करण्यात येत होते.

विमा कंपन्या विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबद्दल टाळाटाळ करीत होत्या किंवा उशिर लावत होत्या. विद्यार्थ्यांच्या अपघाताचे दावे लवकर निकाली लागत नसल्याबाबत विमा कंपन्यामार्फत योजना बंद करून त्या ऐवजी “सानुग्रह अनुदान योजना” प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा निर्णय शासनाने संदर्भाधिन शासन निर्णय दि. ११ जुलै २०११ अन्वये घेतला. सदर योजना दि. २७/०८/२०१० ते दि. २६/०८/२०१२ पर्यंत राबविण्यात आली.

प्रायोगिक तत्त्वावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत राबविण्यात आलेल्या वरील योजनेची प्रभावीरित्या अंमलबजावणी झाली असून मोठ्या प्रमाणावर विदयार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिलासा मिळालेला आहे. या योजनेची फलश्रुती लक्षात घेता ही योजना दि. २७ ऑगस्ट २०१२ पासून नियमित स्वरुपात सुरु करण्यात आली आहे. सन २०१३ पासून वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप यानुषंगाने प्रस्तुत योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना:-
१. शासन निर्णय क्रमांक पीआरई/२०११/प्र.क्र.२४९/प्राशि-१, दि. १ ऑक्टोबर, २०१३ अन्वये राबविण्यात आलेल्या राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना खालील सुधारणांसंह नियमित स्वरुपात राबविण्यात यावी.
२. सदरची योजना इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणा-या सर्व मुला/मुलींना लागू राहील.
४. विदयार्थ्यांच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार
करण्याची जबाबदारी विदयार्थ्यांचे पालक व संबंधित
शाळांचे मुख्याध्यापक/गट शिक्षणाधिकारी/
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)/शिक्षण निरिक्षक यांची राहील.
५. या योजनेमध्ये खालील बाबींचा सामवेश राहणार नाही.
– आत्महत्येचा प्रयत्न करणे.
■ आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी
करुन घेणे.
■ गुन्हयाच्या उद्देशाने कायदयाचे उल्लंघन करताना
झालेला अपघात.
■ अंमली पदस्थ्यांच्या अंमलाखाली असताना झालेला
अपघात.
■ नैसर्गिक मृत्यू
■ मोटार शर्यतीतील अपघात
६. या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या
कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्य क्रमानुसार अदा करावीत.
– विद्यार्थ्याची आई.
■ विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडील.
विदयार्थ्याची आई वडील हयात नसल्यास १८
वर्षावरील भाऊ किंवा अविवाहीत बहीण किंवा पालक
७. या योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी
खालीलप्रमाणे प्रत्येक जिल्हयात समिती गठित करण्यात येत आहे.
■ जिल्हाधिकारी अध्यक्ष : सदस्य
मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद ) /
महापालिका उप आयुक्त
■ पोलीस अधिक्षक/पोलीस उपायुक्त : सदस्य
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)/प्रशासन अधिकारी
(शिक्षण)/ शिक्षण निरिक्षक : सदस्य
■ जिल्हा आरोग्य अधिकारी/सिव्हील सर्जन / सक्षम
वैद्यकीय अधिकारी : सदस्य
शिक्षणाधिकारी (प्राथमिक / शिक्षण निरिक्षक) /
प्रशासन अधिकारी (शिक्षण) : सदस्य सचिव
