शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक डीपी योजना जाहीर
शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक डीपी योजना जाहीर केलेली आहे. तर राज्यात कोणत्या शेतकऱ्यांना ती एक शेतकरी एक डीपी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच डीपी ही स्वतंत्र दिली जाणार आहे तर या विषयीची यादी शासनाने जाहीर केलेले आहेत. अर्जदारांना पारंपारिक पध्दतीने लघुदाब वाहिनीवर व उच्चदाब वितरण प्रणालीवर वीज जोडणी देण्याचे नियोजित आहे.

त्यापैकी सुमारे ४०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पद्धतीने लघुदाब वाहिनीवर ऊर्जीकरण करण्याकरीता लागणारा निधी महावितरणतर्फे उपलब्ध करुन देण्याचे नियोजित असून व उर्वरित सुमारे ६०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पध्दतीने उच्चदाब वितरण प्रणालीवर ऊर्जीकरण करण्याकरिता प्रती पंप रु.२.५० लाख याप्रमाणे प्रतिवर्षी रु.१,५०० कोटी भागभांडवल, धोरण कालावधीत शासनाद्वारे महावितरणला उपलब्ध करुन दिले जाणारआहे. सन २०२१-२२ या वर्षाकरिता अनु-सुचित जाती वर्गवारीतील प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे. वीज जोडणी देण्या करिता येणारा खर्च सुमारे रु.८९ कोटी भागभांडवल स्वरुपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
