माझी कन्या भाग्यश्री… जाणून घ्या कसा घेता येईल लाभ
माझी कन्या भाग्यश्री सुधारित… मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे समाजातील मुलगा मुलगी हा भेद निघून जावा त्याचप्रमाणे जन्मलेल्या मुलाला व्यवस्थित रित्या शिक्षण मिळावं येथेकुठल्या प्रकारची अडचण होऊ नये या सर्वांच्या अनुषंगाने आपण पाहिले की सुकन्या योजना सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र मध्ये पण जर पाहिलं तर माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली होती मात्र ही योजना राबवत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी काही पात्रता निकष या सर्व त्याच्यामुळे काही जण पात्र होऊ शकत नव्हते.

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनांच्या परिपूर्ण आधी सूचना किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती मिळाल्यामुळे बरे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात अशा प्रकारची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री सुधारित.
माझी कन्या भाग्यश्री सुधारितसाठी काय अटी असतील कोण याचे पात्र लाभार्थी पात्र असतील त्यांच्यासाठी पात्रतेचे निकष काय असतील त्याप्रमाणे योजनेचा लाभार्थी जर असेल तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा या अर्जाचा नमुना कुठे जमा करायचा याच्या बद्दल सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत.याचे कारण म्हणजे बर्याच मोठ्या प्रमाणात याबद्दल विचारणा केली जाते आणि नियोजनबद्ध ती परिपूर्ण अशी माहिती न मिळाल्यामुळे बरेच सारे पात्र लाभार्थी सुद्धा योजनेत सहभागी होत नाही.
अर्ज कुठे करावा:- योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद, महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला यांचे कार्यालय विनामूल्य उपलब्ध असतील. योजनेच्या अंमलबजावणी करिता अर्ज करताना अंतर्गत लाभाकरिता मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेवीकेकडे प्रपत्र अ किंवा ब मध्ये अर्ज सादर करावा.

ही योजना कोणास लागू होणार:- जर एका मुलीनं नंतर मातेने/ पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावे 50 हजार रुपये बँकेमध्ये जमा होणार.
जर दोन मुली नंतर मातेने / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावे 25 हजार
रुपये बँकेमध्ये जमा होणार.