Take a fresh look at your lifestyle.

विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्याकरीता आपली पेंशन आपल्या दारी

0

जळगाव (जिमाका वृत्तसेवा)- विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुंटुब अर्थसहाय्य या योजना राबविल्या जातात दिव्यांग, वयोवृध्द, अनाथ बालके, दुर्धर आजारी व्यक्ती, एकल महिला इत्यादी हे या योजनांचे लाभार्थी आहेत.

या लाभार्थ्याना त्यांचे बँक खात्यात दरमहा अर्थसहाय वितरीत करण्यात येते (राष्ट्रीय कुंटुब अर्थसहाय्य एकरकमी अर्थसहाय्य) अशावेळी दिव्यांग, वयोवृध्द दुर्धर आजारी व्यक्ती व इतर लाभार्थ्याना बँकेत जावुन त्यांचे अर्थसहाय्य आवश्यकतेनुसार काढावे लागते दरवेळी या लाभार्थ्याना बँकेत जाणे शक्य होईलच असे नाही. तसेच त्यांचे घरापासून बँकेचे अंतर, बँकेतील गर्दी या अशा कारणांमुळे अर्थसहाय्य काढतांना लाभार्थ्याचे श्रम, वेळ व पैसा खर्च होतो व त्यांना कष्ट पडतात. अशा परिस्थितीत भारतीय पोस्ट खात्यामार्फत राबविण्यात येणारी “आपली पेंशन आपल्या दारी” योजना लाभार्थ्याना अधिक मदतकारी ठरु शकते. यात लाभार्थ्याचे बँक खात्यात जमा असलेले अर्थसहाय्य इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेचे कर्मचारी / प्रतिनिधी लाभार्थ्याचे घरी जावुन आधार क्रमांक पडताळणी आधारीत प्रक्रियेने Adhar enabled payment system- (Aeps) लाभार्थ्यांना अर्थसहाय्य अदा करु शकतात.

या इंडिया पोस्ट बॅकेचे कर्मचारी हँड हेल्ड डिवाईस वर लाभार्थ्याचे आधार पडताळणीकरीता अंगठा/ बोंटाचा ठसा घेतील व लभार्थ्याचे आधार पडताळणीनंतर त्यांचे बँकेतील जमा रक्कमेतुन लाभार्थ्याने मागणी केल्याप्रमाणे अनुदान त्यास अदा करतील, यात आधार पडताळणी होवू न शकल्यास अशा लाभार्थ्याना निवृत्तीवेतन घरपोच अदा करता येणार नाही. अशा लाभार्थ्यानी त्यांचे बँकेत जावुन आपले निवृत्तीवेतन काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याकरीता लाभार्थ्याकडून कुठलीही फी किंवा शुल्क इंडिया पोस्ट बॅकेच्या कर्मचाऱ्यांकडून आकारण्यात येणार नाही. सदर योजना विनामुल्य व ऐच्छिक स्वरुपाची आहे. यांत लाभार्थ्याचा आधार व मोबाईल क्रमांक त्यांचे बॅक खातेशी संलग्न (link) असणे गरजेचे आहे. सध्या ही योजना राष्ट्रीयकृत बॅकांसाठी लागु राहील यांत कुठलेही बॅक खाते लाभार्थ्याना बदलण्याची गरज नाही. लाभार्थ्याच्या योजनेचे मुळ बॅक खाते तेच राहील. यांत लाभार्थ्यीस त्यांच्य बॅक खात्यात जमा असलेल्या रक्कमेतुन रक्कम रु. 10,000/- मर्यादेपर्यत रक्कम काढता येतील.

जळगाव जिल्हयात 1 जुलै, 2022 पासुन विशेष सहाय्य योजनेच्या 100% लाथार्थ्यांना “आपली पेंशन आपल्या दारी” या योजने अंतर्गत अर्थसहाय्य घरपोच वाटप करावयाचे आहे. या करीता गावनिहाय विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांची याबाबत तलाठी व इंडिया पोस्ट बॅकेच्या अधिकारी / कर्मचारी यांनी गावात बैठक घ्यावी. व लाभार्थ्याना सदर योजना समजावुन सांगावी तसेच या प्रक्रियेचा Demo दयावा असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व तहसिलदार व संगायो शाखेतील अधिकारी / कर्मचारी यांना दुरचित्रवाणी परिषदेव्दारे दिले आहे.