आज बारावीचा निकाल; निकालाबाबत शासनाने जारी केले सूचना पत्रक
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षा सन २०२२ चा निकाल दि. ८ जून २०२२ रोजी दुपारी १ वा. लागणार आहे, तशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यंदा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

मंडळामार्फत मार्च – एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी)परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा खालील अधिकृत संकेतस्थळांवर बुधवार दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे
https://mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in
https://www.tv9marathi.com/board-
result-registration-for-result-
marksheet-12th
https://indiatoday.in/education-
today/results
https://mh12.abpmajha.com
https://lokmat.news18.com
