विधवा, अपंग व निराधारांसाठी अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांचा लाभ कसा घ्यावा? जाणून घ्या सविस्तर माहिती
अपंग योजना, निराधार अपंग, विधवा योजना राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, विधवा, अपंग व शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्तींना मदत व्हावी तसेच गोरगरीब जनतेला आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने विशेष सहाय्य योजना सुरू करण्यात आली. यामध्ये निराधारांना जगण्याचा आधार देणाऱ्या योजनांमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना अशा अनुदानाच्या विशेष सहाय्य योजना राबविण्यात येतात.

विधवा, अपंग, निराधार अनुदान विशेष सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील महाऑनलाईन CSC च्या वेबसाईट ओपन करा. तुमच्याकडे लॉगिन करण्यासाठी CSC VLE युजर आयडी, पासवर्ड नसेल तर जवळच्या CSC सेंटर किंवा ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्रा मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.
https://cscservices.mahaonline.gov.in
महाऑनलाईन CSC ची वेबसाईट ओपन झाल्यावर युजर आयडी, पासवर्ड टाकून लॉगिन करा.
