शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची ३० जून २०२२ पर्यंत कुठलीही बदली होणार नाही; शासनाचा निर्णय
शासन निर्णय क्रमांकः एसआरव्ही -२०२२/प्र.क्र.२९/कार्या १२ मादाम कामा मार्ग, राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२
तारीख २७ मे, २०२२
शासनाच्या निदेशानुसार, “महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि
शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५” नुसार करण्यात येणाऱ्या बदल्या सन २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षी दि. ३० जून, २०२२ पर्यंत करण्यात येऊ नयेत. तथापि, प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास, अशी बदली मा.मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेने करावी. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०५२७१६०६५३१००७ असा
आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला.

