Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषद आरोग्य विभागात लवकरच 10 हजार पदांची भरती

0

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्यसेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत ही भरती करण्यात स्थापन झालेल्या जिल्हा निवड येणार असल्याची. माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे. पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार आलेल्या अजांतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

एकूण १० हजार १२७ पदे रिक्त 

आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे

औषध निर्मात्याची ३२४ पदे

प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ९६

आरोग्यसेवकाची ३१८४ पदे 

आरोग्यसेविकांची ६४७६ पदे

पाच संवर्गांसाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून या अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार सुधारित मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील आकृतिबंध मंजूर करण्यासाठी आहेत.आकृतिबंध अंतिम करून त्यास पदभरतीची कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.