Take a fresh look at your lifestyle.

संजय गांधी निराधार योजना; जाणून घ्या मिळणारा लाभ

0

संजय गांधी निराधार योजनेतंर्गत तुम्हाला महिन्याला1200 रुपये मिळू शकतात. विधवा महिला, 18 वर्षांखाली अनाथ मुले, ज्या व्यक्तींना काही आजार आहे म्हणजेच कर्करोग, कुष्ठरोग असल्यास तसेच महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पात्रता- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे. वय हे 65 वर्षांच्या आत असणं आवश्यक आहे. बीपीएल यादी मध्ये ज्यांचे नाव त्यांचे वार्षिक उत्पन्न 21 हजार पर्यंत असणं आवश्यक आहे. अपंग असल्यास 50 हजार पर्यंत वार्षिक उत्पन्न असं आवश्यक आहे.

कागदपत्रे- आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट फोटो, अर्ज, टी.सी./ निर्गम उतारा, प्रवर्गानुसार लागणारी कागदपत्रे

लाभ घेण्यासाठी संपर्क- सेतू सुविधा केंद्र, तलाठी किंवा तहसीलदार कार्यालय या ठिकाणी संपर्क करू शकता. याठिकाणी तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेची अर्जाची संपूर्ण माहिती मिळेल.