कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु
‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी कुसुम सौर कृषी पंप ऑनलाईन नोंदणी अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी खालील संकेतस्थळावर भेट दयावी.
https://www.mahaurja.com/meda/
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) पोर्टलला भेट दिल्या नंतर उजव्या महाकृषि ऊर्जा अभियान या बॉक्स मध्ये “महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषीपंप अर्ज नोंदणी” लिंक वर क्लिक करा किंवा खालील थेट लिंक वर क्लिक करा.
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B