Take a fresh look at your lifestyle.

उच्च शिक्षणासाठी कर्ज कसे घ्यावे; जाणून घ्या सविस्तर

0

सध्या उच्च शिक्षण घेणं सर्वसामान्यांना परवडण्याबाहेर गेलं आहे. कारण आपल्याकडे बुद्धिमत्ता असूनही पैशाअभावी आपल्याला उच्च शिक्षण घेता येत नाही.पण सध्या शिक्षणासाठी देखील कर्ज भेटत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची होणारी परवड काहीशी दूर झाली आहे. तसेच उच्च शिक्षण घेण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. पण हे शैक्षणिक कर्ज म्हणजे काय? शैक्षणिक कर्जाचे प्रकार कोणते? सर्वात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक कर्ज घ्यायचं कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती.

शैक्षणिक कर्ज म्हणजे काय?

उच्च शिक्षणासाठी कोणत्याही बँक किंवा खाजगी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाला विद्यार्थी कर्ज किंवा शैक्षणिक कर्ज म्हणतात. तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचे असले तरी कोणत्याही बँकेच्या अटी व शर्तीचे पालन करून तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता.

शैक्षणिक कर्जाचे प्रकार?

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतात साधारणपणे 4 प्रकारचे कर्ज आहेत. त्यात करिअर एज्युकेशन लोन प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन, पालक कर्ज आणि अंडरग्रेजुएट लोन हे आहेत.

1)करिअर एज्युकेशन लोन- जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी कॉलेज किंवा संस्थेतून शिक्षण घेऊन करिअर करायचे असेल, तेव्हा तो करिअर एज्युकेशन लोन घेऊ शकतो.

2)प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन- विद्यार्थ्यांने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन घेतले जाऊ शकते.

3)पालक कर्ज- जेव्हा पालक आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतात, तेव्हा त्याला पालक कर्ज म्हणतात.

5)अंडरग्रेजुएट लोन- शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, देशात आणि परदेशात पदवी मिळवण्यासाठी पदवीपूर्व कर्ज घेतले जाते.

शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे?
•विद्यार्थी कर्ज घेण्यासाठी खालील गोष्टींचे पालन
करणे आवश्यक.
•सर्व प्रथम बँक किंवा संस्था निवडा.
•नंतर विद्यार्थी कर्जाची सर्व माहिती मिळवा.
•बँकेने दिलेले व्याजदर नीट समजून घ्या.
•बँकेने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करा.
•बँक आणि तुमची खात्री झाल्यावर कर्जासाठी अर्ज
करा.

शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे?

1. वयाचा पुरावा 

2. पासपोर्ट साइज फोटो 

3. मार्कशीट 

4. बँक पासबुक 

5. आईडी प्रूफ 

6. एड्रेस प्रूफ

7.कोर्स डिटेल्स 

8.विद्यार्थी आणि पालकांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड

9.पालकांचा उत्पन्नाचा दाखला