Take a fresh look at your lifestyle.

नागरिकांसाठी महत्वाची बातमी; सामान्य नागरिकांना मिळणार मंत्रालयात प्रवेश; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

शासन परिपत्रक क्रमांक:- एमआयएस-०९१९/प्र.क्र.२२६/विशा

२ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

जगभरात पसरलेल्या करोना विषाणू रोगाचा प्रसार टाळण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून गृह विभाग, शासन परिपत्रक क्र. एमआयएस-०९१९/प्र.क्र.२२६/विशा-४, दिनांक १६ मार्च, २०२० अन्वये मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना प्रवेशपास देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या व्हिसिटर पास मॅनेजमेंट सिस्टिम (VPMS) प्रणालीव्दारे मंत्रालय प्रवेशपास देण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली होती. तसेच सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-१८२०/प्र.क्र.१२/२०२०/१८-अ,दिनांक ३०.०५.२०२१ अन्वये कोवीड-१९ विषाणच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेच्या सुविधेसाठी मंत्रालय प्रवेशव्दाराजवळ असलेल्या प्रवेशपास खिडक्यांच्या ठिकाणी बाहेरुन येणारे टपाल स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली. याकरिता मंत्रालय प्रवेशपास देण्यासाठी राबविण्यात येत असलेली VPMS प्रणाली पूर्ववत सुरु करण्यात आल्यानंतर सदर खिडक्यांचा वापर करण्यासाठी सदर खिडक्यांचा ताबा परत गृह विभागास देण्यात यावा, या अटीच्या अधीन राहून गृह विभागाची मान्यता देण्यात आली होती.

२. करोना विषाणूच्या प्रादुर्भवाच्या काळात केंद्र शासन, आरोग्य विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाव्दारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना, परिपत्रक व शासन निर्णयाव्दारे देण्यात आलेल्या सूचना व लावण्यात आलेल्या निबंधानुसार सदर आदेश लागू करण्यात आले होते.

३. दरम्यानच्या कालावधीत विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच सर्वसामान्य जनतेकडून मंत्रालयात सर्वसामान्य जनतेसाठी मंत्रालय प्रवेश सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. तसेच, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, शासन आदेश दिनांक ३१.०३.२०२२ नुसार महाराष्ट्र राज्यात करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

४. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात येणा-या अभ्यांगतांना प्रवेशपास देण्यासाठी राबविण्यात येत असलेली Visitor Pass Management System (VPMS) दिनांक १८ मे, २०२२ पासून पूर्ववत सुरु करण्यात येत आहे. यासंदर्भात गृह विभाग, शासन निर्णय क्रमांक:-पीईएस-४२१/प्र.क्र.१०८/विशा-४दिनांक २४.१२.२०२१ अन्वये विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती लागू राहतील.

५.सदर प्रणाली पूर्ववत चालू केल्यामुळे बाहेरुन येणारे टपाल प्रत्यक्षात मंत्रालयात स्विकारता येईल. त्याअनुषंगाने सदर ठिकाणी चालू असलेली टपाल व्यवस्था दिनांक १८ मे, २०२२ पासून बंद करण्यात येऊन सदर खिडक्यांचा ताबा पुन्हा गृह विभागास देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने सर्व मंत्रालयीन विभागांच्या आस्थापनांना आपल्या स्तरावरुन सूचित करावे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक २०२२०५०९१८२८१७४६२९ असा आहे.