विद्यार्थ्यांसाठी सोनेरी संधी! महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी UGC-NET/SET परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी BARTI UPSC ONLINE या यु-ट्यूब चॅनलद्वारे UGC-NET / SET परीक्षेचे ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरु करण्यात येत आहेत. पेपर क्र. १ समान असल्याने तज्ञ प्रशिक्षकांद्वारे पेपर १ चे मार्गदर्शन देण्यात येईल. पेपर क्र. २ करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्जाद्वारे मागणीचा कौल घेण्यात येईल व तज्ञ प्रशिक्षकांद्वारे अधिक मागणीचे प्रथम ५ विषयांचे प्रशिक्षण देण्यात येईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी बार्टी, पुणे संस्थेच्या www.barti.in संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील “UGC-NET/ SET ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज” या लिंकवरील अर्ज भरावा. फॉर्म भरण्यासाठी अंतिम दि. १५ मे २०२२.

फॉर्म भरण्यास अडचण आल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा- ०२०-२६३३३५९६/२६३३३५९७.
धम्मज्योती गजभिये
महासंचालक, बार्टी, पुणे