Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे बोर्डाकडून एनटीपीसी भरतीच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर

0

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड एनटीपीसी भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करणार्‍या उमेदवारांसाठी महत्वाचे अपडेट आहे. रेल्वे भरती मंडळातर्फे विविध रेल्वे झोनमध्ये ३५ हजारांहून अधिक रिक्त पदे भरली जात आहे. या भरतीची निवड प्रक्रिया सुरु असून या निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT 2) होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.बोर्डाने मंगळवारी १२ एप्रिल २०२२ रोजी जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, आरआरबी एनटीपीसी सीबीटी २ चे आयोजन ९ आणि १० मे २०२२ करण्यात आले आहे. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल.

या पदांसाठी सीबीटी २ परीक्षा

रेल्वे भरती बोर्डाने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, कॉम्प्युटर आधारित चाचणीचा दुसरा टप्पा केवळ भरतीच्या चौथ्या आणि सहाव्या वेतन-स्तरांसाठी जाहीर केलेल्या तारखांना आयोजित केला जाणार आहे. वेतन स्तर २,३ आणि ५ साठी सीबीटी २ च्या तारखा मंडळाकडून नंतर जाहीर केल्या जाणार आहेत.

रेल्वे भरती बोर्डाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, पहिल्या टप्प्यात कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT 1) २८ डिसेंबर २०२० ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत सात टप्प्यांत घेण्यात आली. त्याच वेळी, या परीक्षांचे निकाल ३० मार्च आणि १ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करण्यात आले. या निकालांमध्ये उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखा बोर्डाने जाहीर केल्या आहेत.रेल्वे भर्ती मंडळाद्वारे नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी (एनटीपीसी) फेज 7 ची परीक्षा वेगवेगळ्या झोनमध्ये घेण्यात येणार आहे, त्यासाठी प्रवेश-पत्र (ई-कॉल लेटर), परीक्षा-शहर जाणून घेण्यासाठी लिंक ऍक्टिव्ह करण्यात आली आहे . सातव्या टप्प्यातील संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) साठी प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांना या परीक्षेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपले प्रवेश पत्र rrbcdg.gov.in येथे किंवा संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डाउनलोड करावे.