दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलांसाठी शैक्षणिक वर्ष (2022-23) अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूल, जळगाव येथे प्रवेश सुरु
दरवर्षाप्रमाणे भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल,जळगाव या शाळेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलांसाठी शैक्षणिक वर्ष (2022-23) साठी इयत्ता 1 ली वर्गासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी ज्या मुलांचा जन्म 1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2016 मध्ये झाला असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंकवरील फॉर्मची प्रिंट काढून फॉर्म भरून किंवा प्रत्यक्ष शाळेत येऊन कार्यालयातून फॉर्म घेऊन भरलेला फॉर्म आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.17/04/2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत शाळेत जमा करावा.
खालील लिंकवर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा.
http://anubhutischool.in/Anubhuti2Form.pdf