Take a fresh look at your lifestyle.

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारीत योजने अंतर्गत अर्ज करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

0

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, अमळनेर, एरंडोल, भुसावळ, चाळीसगाव या तालुक्यातून गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारीत योजनेसाठी वरील तालुक्यातील गोवंश सेवा केंद्र या संस्थांकडुन विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण माहितीसह या कार्यालयास 6 एप्रिल, 2022 पर्यंत जिल्ह्यातील तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेमार्फत प्रस्ताव आवश्यक व परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज मागविण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी व अर्जाचा विहित नमुन्यासाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती पाचोरा,अंमळनेर,एरंडोल, भुसावळ व चाळीसगाव यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.