महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील होतकरू लाभार्थ्यांना मध केंद्र योजनेतंर्गत ‘प्रशिक्षण’ घेण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जळगांव यांचे वतीने मध केंद्र योजने अंतर्गत १० दिवसीय मध प्रशिक्षण सत्र दिनांक २१/०३/२०२२ ते ३०/०३/२०२२ पर्यंत कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद रोड येथे ठीक सकाळी १०.०० वाजता सुरू करण्यात येत आहे. अर्ज दिलेले व रक्कम भरणा केलेले लाभार्थी तसेच व ५० टक्के रक्कम भरण्यास तयार असलेले होतकरू लाभार्थी यांनीही प्रशिक्षण ठिकाणी उपस्थित राहावे. असे जळगांव जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी कळविले आहे.

अधिक माहिती साठी संपर्क
१) श्री. सुरवाडे ९६२३५७८७४०
२) श्री. रुपेश पाटील ९४२०३९२८७२