Take a fresh look at your lifestyle.

UPSC CDS Bharti 2026: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2026 द्वारे 451 जागांसाठी भरती; अर्जाची मुदत 11 जूनपर्यंत वाढवली

0

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2026 अंतर्गत विविध संरक्षण अकॅडमींमधील एकूण 451 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली असून आता 11 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

पदांचा तपशील

  • भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून – 100 जागा
  • भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला – 26 जागा
  • हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद – 32 जागा
  • ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष), चेन्नई – 275 जागा
  • ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (महिला), चेन्नई – 18 जागा

एकूण जागा : 451

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1, 4 व 5 : कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र. 2 : इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र. 3 : 10+2 स्तरावर भौतिकशास्त्र व गणित विषयासह पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा

  • मिलिटरी अकॅडेमी व नेव्हल अकॅडेमी : जन्म 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2008 दरम्यान
  • हवाई दल अकॅडेमी : जन्म 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2007 दरम्यान
  • ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष व महिला) : जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2008 दरम्यान

अर्ज शुल्क

  • General / OBC : ₹200
  • SC / ST / महिला उमेदवार : शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण

  • संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख : 11 जून 2026 (सायं. 6:00 वाजेपर्यंत)
  • लेखी परीक्षा : 13 सप्टेंबर 2026
Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here