Take a fresh look at your lifestyle.

शासन निर्णय! सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये “दलित” अनुसूचित जाती व नव बौध्द या शब्दांचा वापर करावा -शासनाचे निर्देश

0

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन निर्णय क्र.सी.बी.सी.१२/२०१७/प्र.क्र.३४/मावक मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : – १८ सप्टेंबर, २०१९

संदर्भ :- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय यांचे पत्र क्र.१२०१७/०२/२०१८

SCD( R.L.Cell ) दि. १५/०३/२०१८.

शासनाच्या विविध विभागांच्या योजना, शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना यामध्ये “दलित” या शब्दाचा वापर केलेला असल्यास त्याऐवजी पर्यायी शब्द वापरण्याबाबत मा. उच्च न्यायालय,खंडपीठ नागपूर येथे याचिका क्र.११४/२०१६ दाखल करण्यात आली आहे. या दरम्यान उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये “दलित” शब्दाऐवजी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४१ नुसार निर्गमित केलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशाअंतर्गत नमूद अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता , सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादीमध्ये इंग्रजी भाषेत Scheduled Caste आणि अन्य राष्ट्रीय भाषांमध्ये Scheduled Caste या नामाभिधानाच्या योग्य अनुवादित शब्दाचा वापर करावा, अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे निर्णय घेण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय

रिट याचिका क्र.२०४२०/२०१७ अंतर्गत मा. उच्च न्यायालय, मध्यप्रदेश यांनी दलित शब्द ऐवजी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असा शब्द वापरण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. “… that The Central Government /State government and its functionaries would refrain from using the nomenclature “Dalit” for the Members belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes as the same does not find mentioned in the Constitution of India or any statute.”

मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय यांनी संदर्भाधीन पत्रान्वये पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत . “All the states Governments/U.T. Administrations are requested that for all official transactions matters, dealings, certificates etc., the constitutional term -Schedules Caste in English., and its appropriate translation in other national languages should alone be used for denoting the persons belongings to the scheduled Castes notified in the Presidential Orders issued under Article389 of the Constitution of India.”

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४१ नुसार निर्गमित केलेल्या मा. राष्ट्रपतींच्या आदेशांतर्गत नमूद अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता, सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये “दलित” शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत “Scheduled Caste & Nav Bouddha” आणि मराठी भाषेत “अनुसूचित जाती व नव बौध्द” या संबोधनाचा वापर करावा.