Take a fresh look at your lifestyle.

डिप्लोमा, पदवीधरांना संधी! BSNL मध्ये अप्रेंटिस पदाची भरती

0

हरियाणा सर्कलने २७ डिप्लोमा अप्रेंटिससाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरून २० मार्च २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. अधिकृत नोटिफिकेशननुसार रिक्त पदांची एकूण संख्या ही २७ आहे.रिक्त पदांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. डिप्लोमा अप्रेंटिसची एकूण २७ पदे. अंबाला ४, फरिदाबाद ३, गुडगांव ३, हिसार ४, करनाल ४, रेवाडी ३, रोहतक ६.

या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय २५ वर्षे निर्धारित करण्यात आलेले आहे. आरक्षित वर्गाच्या कँडेडेटच्या नियमानुसार सवलत दिली जाईल. शैक्षणिक योग्यता आणि वयोमर्यादेच्या संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन पाहावे.

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ८ हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल. या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवार बीओटीचे पोर्टल www.mhrdnats.gov.in च्या माध्यमातून २० मार्च २०२२ पर्यंत किंवा त्याआधी अर्च करू शकतात.