अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती २०२१-२२ साठी अर्ज करण्याचे आवाहन
देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती/ नवबौद्ध विद्यार्थ्यांकडून राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांसाठी अटी व शर्ती
1)महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती/ नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
2)शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले पूर्ण शैक्षणिक शुल्क,
3)महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
4)कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ६.०० लाखांपेक्षा कमी असावे.
5)पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे व पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी असेल.
6)अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला शिकत असला पाहिजे. तथापि, त्यापुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतील; परंतु त्यांचा विचार प्रथम वर्षाचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास करण्यात येईल.
7)विद्यार्थी इ. १० वी व १२ वी ची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परीक्षा मंडळातून उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
8)पदवी अभ्यासक्रमासाठी इ. १२ वी च्या परीक्षेमध्ये किमान ५५% गुण मिळविणे आवश्यक राहील व डायरेक्ट द्वितीय वर्षासाठी प्रवेशित विद्याथ्यांना डिप्लोमामध्ये ५५% गुण आवश्यक
9)पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेमध्ये किमान ५५% गुण असावेत.
10)सदरहू शिष्यवृत्ती देश पातळीवरील मान्यताप्राप्त संस्थांमधील अभ्यासक्रमासाठी लागू राहील. संस्थांची यादी संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरातीमधील परिशिष्ट ‘ब’नुसार पाहावयास मिळेल.
11)वेळोवेळी या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित झालेल्या इतर अटी व शर्ती विद्याथ्यांना बंधनकारक असतील.
12)या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा अंतिम अधिकार शासनास राहील,
13)निवड झालेल्या विद्यार्थ्यास भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.

लाभाचे स्वरूप
1)परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय संगणक शुल्क, डेव्हलपमेंट फी इ. देण्यात येईल.
2)शैक्षणिक संस्थेतील वसतिगृह व भोजन शुल्क याचा त्यांच्या आकारणीप्रमाणे खर्च देण्यात येईल.
3)शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात जागेअभावी प्रवेश न मिळाल्यास सदर विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी
4)वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेप्रमाणे निर्वाहभत्ता देण्यात येईल.
5)प्रवेशित अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी रु. ५,०००/- व शैक्षणिक साहित्य आणि इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण रु. ५,०००/- असे एकूण रु. १०,०००/- प्रत्येक वर्षी देण्यात येईल.
वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. ११-०३-२०२२ पर्यंत सायं.६.१५ वाजेपर्यंत swcedn.nationalscholar@gmail.com या ई-मेलवर पाठवून त्याची हार्ड कॉपी पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे ४११००१ येथे सादर करण्यात यावेत.
टीप:- कोविड १९ या सांसर्गिक रोगाचा झालेला प्रार्दुभाव लक्षात घेता कोणतेही कारण न देता योजनेची जाहिरात रह करणे, निवड प्रक्रिया पुढे ढकलणे याबाबतचे सर्व अधिकार आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना असतील. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी. ©www.maharashtra.gov.in येथे रोजगार लिंकवर,
महाराष्ट्र शासन
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य
३, चर्च पथ, पुणे ४११००१, दूरध्वनी क्र. : ०२०-२६१३७१८६, २६१२७५६९ ई-मेल : swcedn.nationalscholar@gmail.com