Take a fresh look at your lifestyle.

स्व-गणना प्रक्रिया: पोर्टलद्वारे नागरिकांना स्वतःची माहिती नोंदविण्याची सुविधा

पारदर्शक आणि त्रुटीमुक्त डेटा संकलनासाठी चार टप्प्यांची सुसंगत पद्धत

0

जनगणना कार्याचे सुयोग्य व डिजिटल पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी ‘स्व-गणना फ्लो चार्ट’च्या माध्यमातून एक सुसंगत प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना पोर्टलद्वारे स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती सुरक्षित व अधिकृतरीत्या नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.

ही प्रक्रिया प्रामुख्याने चार प्रशासकीय टप्प्यांमध्ये विभागलेली आहे.

1. टप्पा 1 (प्रवेश व प्राथमिक नोंदणी): अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून कुटुंब प्रमुखाच्या मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने नोंदणी करणे.

2. टप्पा 2 (सत्यापन व स्थान तपशील): ओटीपी (OTP) द्वारे ओळख पडताळणी करणे आणि नकाशावर (Map) आपल्या निवासस्थानाचे अचूक चिन्हांकन करणे.

3. टप्पा 3 (माहिती नोंद व अंतिम सादरीकरण): गणना प्रश्नावली पूर्ण करून माहितीची अचूकता तपासल्यानंतर अंतिम सबमिट करणे व SE ID प्राप्त करणे.

4. टप्पा 4 (क्षेत्रीय पडताळणी): प्रगणक (Enumerator) भेटीदरम्यान SE ID ची पडताळणी करून माहितीची प्रत्यक्ष खात्री करणे.

ही डिजिटल मार्गदर्शिका पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी तसेच माहिती संकलन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.