Take a fresh look at your lifestyle.

नोकरीची संधी तुमच्या दारी! जळगावात ४ मे रोजी रोजगार मेळावा

देशभरातील नामांकित कंपन्यांची उपस्थिती, विविध शैक्षणिक पात्रतेधारकांसाठी सुवर्णसंधी

0

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ४ मे २०२६ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात देशभरातील नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार असून, १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी व पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून, आवश्यक कागदपत्रांसह सकाळी १० वाजता गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.