रोबोटिक सर्जरी: ३डी दृश्य आणि कमी रक्तस्रावामुळे रुग्ण जलद बरे होणार
अत्याधुनिक वैद्यकीय क्षेत्रात रोबोटिक सर्जरी ही क्रांतिकारी प्रणाली ठरत असून, तिचा प्रभावी वापर आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी मजबूत करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासन आयोजित ‘पल्स-2026’ कार्यक्रमात यावर विशेष चर्चासत्र पार पडले.
या सत्रात डॉ. सजल सेन, डॉ. अविनाश सुपे, डॉ. रूमा सिन्हा, डॉ. गगन प्रकाश आणि डॉ. चिन्नाबाबू सुंकावल्ली यांनी सहभाग घेत रोबोटिक सर्जरीचे फायदे अधोरेखित केले.
तज्ज्ञांच्या मते, 3D दृश्य, अचूक हालचाली आणि कमी कंप यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित होते. रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्त्राव आणि जलद बरे होण्याचा फायदा मिळतो.
विशेषतः कर्करोग, मूत्ररोग आणि स्त्रीरोग क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून, अनेक रुग्णांना १-२ दिवसांत डिस्चार्ज मिळत आहे.
ग्रामीण-शहरी दरी कमी करण्यासाठी रोबोटिक सर्जरीचा विस्तार आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.