Take a fresh look at your lifestyle.

जळगावचा झेंडा उंच; ई-गव्हर्नन्समध्ये राज्यावर अधिराज्य

0

महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने दमदार कामगिरी करत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात जळगावने उत्कृष्टतेचा नवा मापदंड निर्माण केला आहे.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित भव्य समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंत्री अशिष शेलार आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

🔹 QCI मूल्यमापनात दमदार कामगिरी भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांनी ठरवलेल्या सात निकषांवर झालेल्या मूल्यमापनात जळगावने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले.

🔹 डिजिटल परिवर्तनाचा प्रभावी नमुना जळगाव प्रशासनाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले:

अद्ययावत व नागरिकाभिमुख संकेतस्थळ (jalgaon.gov.in)

‘आपले सरकार’ पोर्टलवर १९ सेवा पूर्णतः ऑनलाइन

ई-ऑफिसचा १००% वापर

डिजिटल डॅशबोर्ड आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग

‘सेतूदूत जळगाव’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट – २४x७ सेवा

🔹 AI आणि GIS तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणालीद्वारे शासकीय गोदामांतील धान्य साठ्याचे रिअल-टाइम निरीक्षण, स्वयंचलित मोजणी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यात येत आहे. तसेच GIS तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा अचूक डेटा तयार करून नियोजन अधिक प्रभावी करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले: “हे यश संपूर्ण जळगाव प्रशासनाच्या टीमवर्कचे फलित असून, आम्ही हे यश जळगावच्या नागरिकांना समर्पित करतो.”

डिजिटल प्रशासनाच्या दिशेने जळगावचा आदर्श प्रवास आता राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.