Take a fresh look at your lifestyle.

अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये दिलासा! ‘PM-राहत’ योजनेतून 1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार

0

रस्ते अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी केंद्र व राज्य शासनाची ‘PM-राहत’ योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना कमाल ₹1.50 लाखांपर्यंत 7 दिवसांचे उपचार पूर्णतः कॅशलेस दिले जाणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत “गोल्डन अवरमध्ये तातडीचे उपचार देऊन मृत्यूदर कमी करण्यासाठी यंत्रणांनी कटिबद्ध राहावे,” असे स्पष्ट निर्देश दिले.

काय आहे ‘PM-राहत’ योजना?

केंद्राच्या रस्ते परिवहन मंत्रालयाने सुरू केलेली ही योजना अपघातानंतर त्वरित उपचार मिळावेत यासाठी आहे. आयुष्यमान भारत (PMJAY) व महात्मा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांत उपचार उपलब्ध

मोफत उपचाराची सुविधा

▪️ ₹1.5 लाखांपर्यंत खर्च पूर्णतः कॅशलेस

▪️ अपघातानंतर 7 दिवसांपर्यंत उपचार कव्हर

▪️ 24 तासांत रुग्णालयात दाखल झाल्यास लाभ

▪️ भारतीयांसह परदेशी नागरिकांनाही लागू

कोणत्या रुग्णालयांत मिळणार उपचार?

✔️ नियुक्त (Empanelled) रुग्णालये

✔️ अनियुक्त रुग्णालयांतही प्रथम स्थिरीकरण उपचार

➡️ नंतर आवश्यकतेनुसार अंगीकृत रुग्णालयात हलविणे

अंमलबजावणीतील महत्त्वाची भूमिका

▪️ राज्य आरोग्य हमी सोसायटी – उपचार मंजुरी व प्रक्रिया

▪️ पोलीस विभाग – अपघाताची खात्री

▪️ जिल्हा समिती – दाव्यांची अंतिम मंजुरी

▪️ राज्य रस्ते सुरक्षा परिषद – नोडल एजन्सी

आपत्कालीन मदत: अपघात झाल्यास त्वरित 112 हेल्पलाईन वर संपर्क साधण्याचे आवाहन