Take a fresh look at your lifestyle.

महिला बचत गटांना ‘अवजार बँक’साठी २४ लाखांपर्यंत अनुदान; लवकर करा अर्ज

0

महिलांच्या सक्षमीकरणासह कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) – दुसरा टप्पा अंतर्गत मोठी घोषणा करण्यात आली आहे. गाव पातळीवर ‘कृषी अवजार बँक’ स्थापन करण्यासाठी महिला बचत गटांना ६०% अनुदान, कमाल २४ लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पात्रता

या योजनेसाठी

▪️ उमेद, माविम, आत्मा पुरस्कृत व इतर महिला बचत गट

▪️ महिलांच्या ग्राम संघटना

पात्र असतील.

गटामध्ये किमान १० सदस्य (वेगवेगळ्या कुटुंबांतील) असणे आवश्यक.

महत्त्वाच्या अटी

▪️ प्रत्येक गावातून फक्त एकाच गटाची निवड

▪️ यापूर्वी अवजार बँकेचा लाभ घेतलेल्या गटांना अपात्र

▪️ प्रकल्प खर्च २० लाखांपेक्षा जास्त असल्यास ७५% कर्ज घेणे बंधनकारक

कोणती यंत्रसामग्री मिळणार?

महिला गटांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदीसाठी मदत:

✔️ ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित यंत्रे

✔️ पेरणी, लागवड यंत्रे

✔️ कंबाईन हार्वेस्टर

✔️ फवारणी यंत्रे इ.

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक महिला बचत गटांनी https://dbt.mahapocra.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावा.