घरबसल्या PCC! ‘आपले सरकार’ पोर्टलवरून ३० दिवसांत चारित्र्य प्रमाणपत्र
राज्य शासनाच्या डिजिटल सेवा धोरणानुसार चारित्र्य व पूर्वइतिहास पडताळणी (PCC) प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून, नागरिकांना ही सेवा ‘आपले सरकार’ (Aaple Sarkar) पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खाजगी नोकरी, परदेश प्रवास (Visa/Immigration) किंवा सुरक्षा रक्षक नोकरीसाठी इच्छुकांना आता https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करणे अनिवार्य राहील.
सविस्तर GR वाचा👆
शुल्क निश्चित: सामान्य PCC – ₹१५९
सुरक्षा रक्षक PCC – ₹२५९
परदेशासाठी PCC – ₹१५९
प्रक्रिया कशी? ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यामार्फत सखोल पडताळणी केली जाईल. गुन्हे अभिलेख तपासून अर्ज विशेष शाखेकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.
३० दिवसांत प्रमाणपत्र: संपूर्ण प्रक्रिया कमाल ३० दिवसांत पूर्ण करून डिजिटल स्वाक्षरीसह PCC प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाईल.
SMS अपडेट्सची सुविधा: अर्जाची स्थिती नागरिकांना SMS द्वारे कळवली जाईल, तसेच पोर्टलवरही पाहता येईल.
पारदर्शक आणि सुरक्षित प्रक्रिया: ही सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख करण्यावर शासनाचा भर असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर पडताळणी केली जाणार आहे.