रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक: स्वस्त धान्य दुकान किंवा ‘MERA eKYC’ ॲपद्वारे प्रक्रिया उपलब्ध
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील सर्व शिधापत्रिका (रेशन कार्ड) धारकांसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे. रेशन कार्डमधील सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी (e-KYC) पडताळणी तात्काळ पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शासनाच्या या निर्णयामागील उद्देश म्हणजे शासकीय योजनांचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढावी. ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना भविष्यात रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
ई-केवायसी का आवश्यक?
यंत्रणेतील गैरव्यवहार टाळणे, बनावट लाभार्थी कमी करणे आणि खऱ्या गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणे यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

ई-केवायसी कशी कराल?
लाभार्थ्यांना ही प्रक्रिया दोन सोप्या मार्गांनी पूर्ण करता येणार आहे:
👉 स्वस्त धान्य दुकानात जाऊन: आधार क्रमांकाच्या आधारे पडताळणी
👉 ‘MERA eKYC’ मोबाईल ॲपद्वारे: घरबसल्या ऑनलाइन प्रक्रिया
अधिक माहितीसाठी:- नागरिकांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयाशी किंवा शिधावाटप कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच https://rcms.mahafood.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
महत्त्वाची सूचना:- रेशनचा लाभ विनाव्यत्यय सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वेळीच पडताळणी करा… अन्यथा रेशन थांबू शकते!