बळीराजा पाणंद रस्ते योजना; १,००० कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत महसूल विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तब्बल १,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेमुळे पाणंद रस्त्यांचा दर्जा सुधारून शेतापर्यंत बारमाही रस्ते उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आधुनिक शेती यंत्रसामग्री शेतात सहज पोहोचेल तसेच शेतमाल जलद आणि सुरक्षितपणे बाजारात नेणे शक्य होणार आहे.
कापणीनंतरचे नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून, शेतजमिनीच्या बांधावरून होणारे वादही कमी होऊन गावांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होण्यास हातभार लागणार आहे.