Take a fresh look at your lifestyle.

परिचारिकांना मोठा दिलासा; मानधनात दुपटीने वाढ

0

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अंकालीन (कराराधीन) महिला परिचारिकांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मासिक मानधनात वाढ करण्यास शासनाने मंजुरी दिली असून, हा निर्णय १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.

या निर्णयानुसार, सध्या मिळणारे ₹३,००० मानधन वाढवून ₹६,००० प्रति महिना करण्यात आले आहे. म्हणजेच, प्रत्येकी ₹३,००० ची वाढ करण्यात आली आहे.

 

 

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यात या परिचारिकांची महत्त्वाची भूमिकाnलसीकरण, गर्भवती महिलांची तपासणी, आरोग्य जनजागृती अशा कामांमध्ये सक्रिय सहभाग वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मानधनवाढीची मागणी दीर्घकाळ प्रलंबित राज्य मंत्रिमंडळाने फेब्रुवारी २०२६ मधील बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानुसार आता अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

 

अतिरिक्त खर्च :-या मानधनवाढीमुळे शासनावर दरवर्षी सुमारे ₹३९.१८ कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो महिला परिचारिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या सेवेला योग्य मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.