LPG सिलेंडर बुकिंग सोपे: WhatsApp, मिस्ड कॉल, अॅप व वेबसाईटची सुविधा उपलब्ध
घरगुती LPG सिलेंडर बुकिंग आता अधिक सुलभ झाले असून, ग्राहकांना विविध डिजिटल माध्यमांद्वारे सहज बुकिंग करता येत आहे. भारत पेट्रोलियम (Bharatgas), इंडियन ऑइल (Indane) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HP Gas) या तिन्ही प्रमुख कंपन्यांनी ग्राहकांसाठी WhatsApp, मिस्ड कॉल, IVRS, मोबाईल अॅप आणि अधिकृत वेबसाईटद्वारे बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.. ‘HP Pay’ अॅप आणि https://myhpgas.in या वेबसाईटवरूनही बुकिंगची सोय आहे.

या सर्व सुविधांमुळे ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये जाण्याची गरज कमी झाली असून, घरबसल्या काही मिनिटांत सिलेंडर बुकिंग शक्य झाले आहे. डिजिटल सेवांचा वाढता वापर लक्षात घेता, ग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संबंधित कंपन्यांकडून करण्यात आले आहे.