DiGiMHADA: नागरिकांसाठी डिजिटल सेवांचा नवा पर्याय
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) ने नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि जलद सेवा देण्यासाठी “DiGiMHADA” हे डिजिटल व्यासपीठ सुरू केले आहे. “कमी फेऱ्या, शून्य प्रतीक्षा, अधिक सोय” या उद्दिष्टासह या अॅपच्या माध्यमातून म्हाडाच्या विविध सेवा आणि माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.

या अॅपमध्ये नागरिकांना गृहनिर्माण सोडत सेवा, बुक माय होम, RTS सेवा, ई-बिलिंग अशा सुविधा मिळणार आहेत. तसेच स्मार्ट वैशिष्ट्यांमध्ये नियर मी, ब्लॉग व लेख, कार्यक्रम व स्पर्धा, सर्वेक्षण आणि फोरम यांचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, अॅप डाउनलोड करण्यासाठी QR कोडची सुविधा देण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांना सहजपणे अॅपपर्यंत पोहोचता येणार आहे. डिजिटल माध्यमातून पारदर्शक आणि जलद सेवा देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
म्हाडाच्या या उपक्रमामुळे नागरिकांची कार्यालयीन फेऱ्या कमी होऊन वेळ आणि श्रमांची बचत होणार असल्याचे सांगितले जात आहे.