विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! टोयोटामध्ये ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू
१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, नामांकित टोयोटा कंपनीत “कमवा आणि शिका” या उपक्रमांतर्गत काम करण्याची उत्तम संधी देण्यात येत आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना काम करताना शिक्षण व कौशल्य विकासाची संधी मिळणार असून, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आकर्षक विद्यावेतनही मिळणार आहे. प्रथम वर्षात दरमहा ₹१५,८१५ तर द्वितीय वर्षात ₹१७,५०० इतके मानधन देण्यात येणार आहे. तसेच राहण्याची व जेवणाची सोयही अत्यल्प खर्चात (फक्त ₹१,५०० प्रतिमहिना) उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, प्रवेश व प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.
या उपक्रमातून केवळ कौशल्यच नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे कंपनीमध्येच नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी तात्काळ नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल व पुढील शिक्षणासाठी अडचण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक:👇
https://forms.office.com/r/apydbQEqgp