२,१०५ पदांची सुधारित रचना; दिव्यांग सेवेत नवे पर्व
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची मोठी पुनर्रचना केली आहे. आता विभागाचे नाव “दिव्यांग सक्षमीकरण विभाग” असे ठेवण्यात आले आहे. आयुक्त पुणे हे विभाग प्रमुख असतील, तर जिल्हास्तरीय कार्यालयांवर जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पर्यवेक्षण राहील.
वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर GR वाचा 👆
या पुनर्रचनेत संपूर्ण राज्यभरातील २,१०५ पदांचे सुधारित आकृतीबंध मान्य करण्यात आले आहेत, ज्यात नियमित पदे, बाह्य स्रोताद्वारेची पदे तसेच नव्याने निर्माण केलेली पदे यांचा समावेश आहे. मृत संवर्गातील रिक्त पदे रद्द केली जातील आणि नव्याने भरती होणार नाही.
सुधारित योजनेची अंमलबजावणी शासन निर्णय जारी झाल्यानंतर लगेच सुरु होणार आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in या लिंकवर पाहता येईल.
