जळगाव जिल्हयातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा
जळगाव(जिमाका)– सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच भारतीय नागरिकांसाठी खालील प्रमाणे हेल्पलाईन नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष (गृह विभाग), नवी दिल्ली , फोन – टोल फ्री -1800118797
दूरध्वनी क्रमांक -011-23012113/23014105/23017905, फॅक्स -011-23088124
ईमेल – situationroom@mea.gov.in
जळगाव जिल्हयातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
दूरध्वनी क्रमांक -0257-2217193 / 2223180
ईमेल –scy.jalgaon@gmail.com असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.